Ad will apear here
Next
साडेतीनशे महिलांनी पायांनी रंगवले भव्य चित्र
महिला दिनानिमित्त पॅव्हिलियनमध्ये अनोखा उपक्रम

पुणे : तब्बल साडेतीनशे महिलांनी एकत्र येऊन आपल्या पायांनी एक भव्य चित्र साकारले. महिला दिनानिमित्त शुक्रवारी, आठ मार्च २०१९ रोजी पॅव्हिलियन मॉलमध्ये हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. जागतिक विक्रम घडविण्याच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.  


विविध क्षेत्रांतील साडेतीनशे महिला एकत्र येऊन एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर पायांच्या सहाय्याने विविध रंगाच्या सहाय्याने एक आकर्षक चित्र साकारत आहेत, हे दृश्यच विलक्षण देखणे होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. एकमेकींशी समन्वय साधून हे भव्य चित्र पूर्ण करण्यासाठी सर्व सहभागी महिला उत्साहाने प्रयत्न करत होत्या. स्त्री-शक्तीचे अनोखे दर्शन या सांघिक कृतीतून घडत होते. 

‘समानतेचा विचार करा, बदलासाठी नवीन विचार करा, स्मार्ट कृती करा’ अशी या वर्षी महिला दिनाची संकल्पना आहे. तोच संदेश या महिलांनी या उपक्रमातून दिला. 


या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीस नामवंत महिलाही उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या यशाचे रहस्य उलगडले. आपल्या यशस्वी वाटचालीत आलेले अडथळे, त्यावर केलेली मात याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले. महिलांच्या हक्कांसाठी पुढे येण्याचे, प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 


या वेळी या उपक्रमाचे आयोजक मॉलचे सेंटर डायरेक्टर राहील अजनी म्हणाले, ‘जगाला घडविणारी शक्ती म्हणजे स्त्री आहे. महिला त्यांचे कुटुंब, मित्र परिवार, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या माणसांचा आधारस्तंभ असतात. आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व, आपले अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रियांना मानाचा मुजरा. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम आयोजित करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. स्त्री शक्तीचा गौरव करण्याची ही प्रथा पॅव्हिलियन मॉल यापुढेही कायम ठेवेल.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZVFBY
Similar Posts
‘स्त्रियांना पाठबळ मिळाल्यास त्या अशक्य ते शक्य करतात’ पुणे : ‘समाजासमोर आपल्या नेतृत्वाची छाप सोडताना अन्य स्त्रियांनाही प्रेरणा मिळेल अशीच कर्तबगारी महिलांकडून केली जात आहे. स्त्रियांना पाठबळ मिळाल्यास अशक्य ते शक्य होते, हे कर्तृत्ववान  महिलांच्या यशातून अधोरेखित होते,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केले. पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि
‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ पुणे : ‘भारताची तिन्ही सैन्यदले सक्षम असून, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते योग्य तो निर्णय घेतील. समाजाने नाही ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये;तसेच पाकिस्तानला एकदा धडा शिकवलाच पाहिजे;पाकिस्तानवर भारताने दबाव कायम ठेवला पाहिजे,’ असे उद्गार सैन्यदलासाठी काम करणाऱ्या महिलांनी काढले.
देवी : एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान मायलेकींच्या मुलाखती वडिलांचा व्यवसाय पुढे नेणारी मुले बरीच असतात; पण आईचा व्यवसाय पुढे सुरू ठेवणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते. तसेच आईच्या व्यवसायाची परंपरा पुढे नेणाऱ्या मुली तर त्याहूनही कमीच असतात. ही बाब लक्षात घेऊन ‘सुकृति’ने एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या मायलेकींच्या मुलाखतींची मालिका नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित केली आहे
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language